सावखेडा वाळू ठेका व अवैध डिझेल साठा प्रकरणात मोठी कारवाई; चार महसूल कर्मचाऱ्यांचे निलंबन

Spread the love

अमळनेर(प्रतिनिधी ): तालुक्यातील सावखेडा येथील वाळू ठेका आणि अवैध डिझेल साठा प्रकरणात जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेत मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. या प्रकरणात जबाबदारी निश्चित करत अमळनेर व चोपडा तालुक्यातील प्रत्येकी एक मंडळ अधिकारी आणि एक ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) अशा एकूण चार महसूल कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यामार्फत जारी करण्यात आले आहेत.

सावखेडा परिसरातील वाळू ठेक्याच्या कामकाजादरम्यान नियमभंग, देखरेखीतील त्रुटी तसेच अवैध डिझेल साठ्याबाबत गंभीर बाबी निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली होती. चौकशीदरम्यान महसूल विभागाच्या स्थानिक पातळीवरील नियंत्रण व देखरेखीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

प्राथमिक चौकशीत संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडून कर्तव्यात हलगर्जीपणा झाल्याचे आढळून आल्याने अमळनेर तालुक्यातील एक मंडळ अधिकारी व एक तलाठी तसेच चोपडा तालुक्यातील एक मंडळ अधिकारी व एक तलाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.

विशेष म्हणजे, या प्रकरणातील कारवाई केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांपुरती मर्यादित राहणार नसल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे. संबंधित कालावधीतील वाळू ठेक्यावरील देखरेख, महसूल यंत्रणेचे नियंत्रण आणि वरिष्ठ पातळीवरील जबाबदारी याबाबतही छाननी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, अमळनेरच्या तत्कालीन अथवा संबंधित तहसीलदारांच्या भूमिकेबाबत शासन स्तरावर माहिती मागविण्यात आल्याचे समजते. त्यामुळे तहसीलदारांवरही कारवाईची शक्यता वर्तवली जात असून, राज्य शासनाकडून यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळू उत्खनन, वाहतूक आणि महसूल विभागाच्या कार्यपद्धतीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियमांचे उल्लंघन आणि कर्तव्यातील दुर्लक्ष कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश जिल्हा प्रशासनाने या कारवाईतून दिला आहे.

सावखेडा प्रकरणात पुढे आणखी अधिकारी, कर्मचारी किंवा संबंधित ठेकेदारांवर कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

मेहरुणमध्ये एस.आय.आर. अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आतापर्यंत १० शिबिरांचे...

मेहरुण (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरुण परिसरात सुरू असलेल्या एस.आय.आर. (S.I.R.) अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २९ जूनपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत आतापर्यंत १०...

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा,...

जळगाव(प्रतिनिधी ):जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १२ लाख ६ हजार ९०८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा,...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विशाखा...

मेहरुण (प्रतिनिधी) : महिलांना कार्यस्थळी सुरक्षित, सन्मानपूर्ण व भेदभावमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे शैक्षणिक...

संपादक - रजत शेख

Latest