जळगाव शहर वाहतूक शाखेची वाळूमाफियांवर कारवाई; अवैध वाळूसह ३ लाखांचा डंपर जप्त तरसोद फाट्यावरील पुलावर पोलिसांची कारवाई; चालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी: हिरालाल राजपूत): जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेने प्रभावी कारवाई केली आहे. तरसोद फाट्यावरील पुलावर विशेष गस्तीदरम्यान अवैध वाळू वाहतूक करणारा सहा टायरचा डंपर पोलिसांनी पकडला. या कारवाईत तीन ब्रास वाळूसह एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२.१५ वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम हे पोलीस कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यात विशेष गस्त घालत असताना तरसोद फाट्यावरील पुलावरून जळगावकडून भुसावळकडे जाणारा पिवळ्या रंगाचा सहा टायरचा डंपर (क्र. WB 29 A 5591) संशयावरून थांबविण्यात आला. तपासणी केली असता डंपरमध्ये तीन ब्रास वाळू आढळून आली.

 

पोलिसांनी १० हजार रुपये किमतीची वाळू आणि ३ लाख रुपये किमतीचा डंपर असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक मोहन नथ्थू धामोडे (वय २४) आणि डंपर मालक पवन कैलास कोळी (वय २६, दोघे रा. संभाजीनगर, साकेगाव, ता. भुसावळ) यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३०/१७७ आणि ३/१८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान, यापूर्वी २ सप्टेंबर २०२६ रोजीही विशेष गस्तीदरम्यान वैजनाथ, ता. एरंडोल येथील विलास भिवा पाटील (वय ५४) हा ट्रॅक्टरद्वारे नदीकिनारी वाळू खाली करताना आढळून आला होता. त्याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच वाळूमाफियांना पोलीस व महसूल प्रशासनाच्या हालचालींची माहिती पुरविणाऱ्या व्यक्तींवरही लक्ष ठेवून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम व त्यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस नाईक शशिकांत तायडे, पोलीस अंमलदार अमोल घुगे, नितीन पाटील, मिलिंद पाटील, गणेश घुगे आणि शुद्धोधन ढवळे यांचा समावेश होता.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

३२ हजार ४९० झाडांच्या रक्षणासाठी जळगावकरांचा आवाज!भीमाशंकर वृक्षतोडीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना...

जळगाव : (प्रतिनिधी: राजू शेख): भीमाशंकर परिसरातील ३२ हजार ४९० झाडांची वृक्षतोड थांबविण्याच्या मागणीसाठी वन्यजीव संरक्षण बहुद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निषेध निवेदन...

इन्स्टाग्रामवर हनीट्रॅप; गोळीबार प्रकरणी दोघांना अटक!

जळगाव (प्रतिनिधी: हिरालाल राजपूत): तरुणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून तरुणाला भेटण्यासाठी बोलावले आणि त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करत गावठी कट्ट्यातून दोन राऊंड...

प्रभाग क्रमांक १७ च्या पाहणी दौऱ्यात महापौर दीपमाला काळे...

जळगाव (प्रतिनिधी : हिरालाल राजपूत): जळगाव शहराच्या महापौर सौ. दीपमाला काळे यांनी प्रभाग क्रमांक १७ मधील पाहणी दौऱ्यादरम्यान मेहरूण येथील साई मंदिराला सदिच्छा भेट...

संपादक - रजत शेख

Latest