३२ हजार ४९० झाडांच्या रक्षणासाठी जळगावकरांचा आवाज!भीमाशंकर वृक्षतोडीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा सहभाग

Spread the love

जळगाव : (प्रतिनिधी: राजू शेख): भीमाशंकर परिसरातील ३२ हजार ४९० झाडांची वृक्षतोड थांबविण्याच्या मागणीसाठी वन्यजीव संरक्षण बहुद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निषेध निवेदन सादर करण्यात आले. या मोहिमेत संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूणचे मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभाग नोंदविला.

 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र गेंदालाल फालक, सचिव योगेश अरुण गालफाडे आणि संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण सुरेश देवरे उपस्थित होते.

 

भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीमुळे जैवविविधता, वन्यजीवांचे अधिवास आणि पर्यावरणाचा समतोल धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात आली. वृक्षतोडीचा निर्णय थांबवून पर्यावरणीय परिणामांचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

संत ज्ञानेश्वर विद्यालयामार्फत बीजसंकलन, सीड बँक, वृक्षसंवर्धन, प्लास्टिक संकलन आणि कचरा व्यवस्थापन यांसारखे पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जातात. केवळ वृक्षारोपण नव्हे, तर अस्तित्वातील झाडांचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

 

भीमाशंकरमधील वृक्षतोड रोखण्यासाठी सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगाव शहर वाहतूक शाखेची वाळूमाफियांवर कारवाई; अवैध वाळूसह ३...

जळगाव (प्रतिनिधी: हिरालाल राजपूत): जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेने प्रभावी कारवाई केली आहे. तरसोद फाट्यावरील पुलावर विशेष गस्तीदरम्यान अवैध...

इन्स्टाग्रामवर हनीट्रॅप; गोळीबार प्रकरणी दोघांना अटक!

जळगाव (प्रतिनिधी: हिरालाल राजपूत): तरुणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून तरुणाला भेटण्यासाठी बोलावले आणि त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करत गावठी कट्ट्यातून दोन राऊंड...

प्रभाग क्रमांक १७ च्या पाहणी दौऱ्यात महापौर दीपमाला काळे...

जळगाव (प्रतिनिधी : हिरालाल राजपूत): जळगाव शहराच्या महापौर सौ. दीपमाला काळे यांनी प्रभाग क्रमांक १७ मधील पाहणी दौऱ्यादरम्यान मेहरूण येथील साई मंदिराला सदिच्छा भेट...

संपादक - रजत शेख

Latest