इन्स्टाग्रामवर हनीट्रॅप; गोळीबार प्रकरणी दोघांना अटक!

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी: हिरालाल राजपूत): तरुणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून तरुणाला भेटण्यासाठी बोलावले आणि त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करत गावठी कट्ट्यातून दोन राऊंड गोळीबार केल्याची घटना वरणगाव येथे घडली होती. या थरारक प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा करत दोन आरोपींना अटक केली आहे.

 

१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सरफराज सय्यद सकिर सय्यद (वय २४, रा. मुक्ताईनगर) याला इन्स्टाग्रामवरील तरुणीच्या नावाने असलेल्या खात्यावरून मेसेज व कॉल करून वरणगाव येथील फुलगाव उड्डाणपुलाखाली बोलावण्यात आले. तो घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी लोखंडी रॉडने डोक्यावर व पायावर वार केले. त्यानंतर गावठी कट्ट्यातून दोन गोळ्या झाडून त्याला गंभीर जखमी केले.

 

घटनेनंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पथकाने तपास सुरू केला. हल्ल्यानंतर अवघ्या ४५ मिनिटांत बंद करण्यात आलेल्या इन्स्टाग्राम खात्याचे तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला.

 

या प्रकरणी भूषण उर्फ बिस्ला राजू सावळे (वय २०) आणि सिद्धार्थ रामदास ढिवरे (वय २७, दोघेही रा. फेकरी, ता. भुसावळ) यांना ताब्यात घेण्यात आले.

 

जुन्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कट

 

पोलिसांच्या चौकशीत जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले. यापूर्वी महामार्गावर झालेल्या वाहन अपघातादरम्यान सरफराज व त्याच्या मित्रांचा आरोपींसोबत वाद झाला होता. त्यावेळी आरोपींच्या वाहनाची तोडफोड करून त्यांना मारहाण करण्यात आली होती. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी इन्स्टाग्रामवर तरुणीच्या नावाने खाते तयार करून सरफराजला जाळ्यात ओढल्याचे तपासात निष्पन्न झाले.

 

गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा हा आरोपींचा पूर्वीचा साथीदार मयत सागर कहार याने दिल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. गावठी कट्टा, मोटारसायकल आणि मोबाईल याबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

 

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, दीपक जगदाळे, जितेंद्र वल्टे, संतोष पवार तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

 

तसेच पोलीस हवालदार विनोद पाटील, गोपाल गव्हाळे, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, श्रीकृष्ण देशमुख, प्रेम सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, रतन गीते, ईश्वर पाटील, विलास गायकवाड, मिलिंद जाधव, गौरव पाटील आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.

 

दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी वरणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगाव शहर वाहतूक शाखेची वाळूमाफियांवर कारवाई; अवैध वाळूसह ३...

जळगाव (प्रतिनिधी: हिरालाल राजपूत): जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेने प्रभावी कारवाई केली आहे. तरसोद फाट्यावरील पुलावर विशेष गस्तीदरम्यान अवैध...

३२ हजार ४९० झाडांच्या रक्षणासाठी जळगावकरांचा आवाज!भीमाशंकर वृक्षतोडीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना...

जळगाव : (प्रतिनिधी: राजू शेख): भीमाशंकर परिसरातील ३२ हजार ४९० झाडांची वृक्षतोड थांबविण्याच्या मागणीसाठी वन्यजीव संरक्षण बहुद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निषेध निवेदन...

प्रभाग क्रमांक १७ च्या पाहणी दौऱ्यात महापौर दीपमाला काळे...

जळगाव (प्रतिनिधी : हिरालाल राजपूत): जळगाव शहराच्या महापौर सौ. दीपमाला काळे यांनी प्रभाग क्रमांक १७ मधील पाहणी दौऱ्यादरम्यान मेहरूण येथील साई मंदिराला सदिच्छा भेट...

संपादक - रजत शेख

Latest