जळगाव (प्रतिनिधी : हिरालाल राजपूत): जळगाव शहराच्या महापौर सौ. दीपमाला काळे यांनी प्रभाग क्रमांक १७ मधील पाहणी दौऱ्यादरम्यान मेहरूण येथील साई मंदिराला सदिच्छा भेट देत दर्शन घेतले.
या भेटीदरम्यान मंदिर परिसरातील स्वच्छता तसेच प्रभागातील स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रभागाचे माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी महापौरांना प्रभागातील स्वच्छतेची सद्यस्थिती, सुरू असलेले स्वच्छता उपक्रम आणि आवश्यक उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.
तसेच प्रभागातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना, नागरिकांच्या समस्या आणि परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत परिसरातील समस्या जाणून घेण्यात आल्या. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच प्रभागाचा स्वच्छ आणि सुंदर विकास करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलण्याबाबत चर्चा झाली.
महापौरांच्या या पाहणी दौऱ्यामुळे प्रभागातील स्वच्छता व नागरी सुविधांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले गेले.




