जळगाव :(जिल्हा प्रतिनिधी : इमरान खान)
जळगाव शहरातील एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या घटनेचा छडा लावत पोलिसांनी एका चोरट्यास अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 28 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. 28 डिसेंबर 2026 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपासून ते दि. 29 डिसेंबर 2026 रोजी सकाळी 9.30 वाजेच्या दरम्यान जळगाव शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील टी.एम. नगर परिसरातील सर्वे नं. 511 ते 514 येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या घराचा कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी नळ फिटींग व लाईट फिटींगचे साहित्य चोरून नेले होते.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दि. 7 जानेवारी 2026 रोजी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गु.र.नं. 25/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305(अ), 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची विशेष टीम तयार करण्यात आली.
या पथकात पोउपनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सफौ/05 विजयसिंग पाटील, पोहेकॉ रमेश चौधरी, गणेश ठाकरे, नितीन ठाकुर, राहुल घेटे, किरण पाटील आदींचा समावेश होता.
पथकाने घटनास्थळ व शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
नेत्रम विभागातील पोलीस कर्मचारी पंकज खडसे, कुंदनसिंग बयस व मुबारख देशमुख यांच्या मदतीने फुटेजचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले.
तसेच बातमीदारांच्या मदतीने संशयिताचा शोध घेण्यात आला.
तपासादरम्यान सैय्यद उबेद सैय्यद रफीक पटवे (वय 19, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचा एक साथीदार हा विधिसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून एकूण ₹28,000 किमतीचे नळ व लाईट फिटींगचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सफौ/05 विजयसिंग पाटील व पो.कॉ. निलेश पाटील करीत आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.









