मैत्रिणीने व्यसनाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सोसह गुन्हा

Spread the love

जळगाव( प्रतिनिधी) : शहरात एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला तिच्याच मैत्रिणीने सिगारेट, दारू व अमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी लावून एका तरुणाच्या जाळ्यात ओढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध पोक्सोसह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी व तिची मैत्रीण एकाच शाळेत शिक्षण घेत होत्या. ऑक्टोबर २०२४ मध्ये मैत्रिणीने पीडितेला प्रथम सिगारेटचे व्यसन लावले. त्यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये पीडितेचे आई-वडील गावाला गेले असताना, मैत्रिणीने तिला आरोपी निर्मल तिवारी याच्यासोबत कारमधून नेले. तेथे तिला सिगारेट, दारू व गांजा सेवन करण्यास प्रवृत्त करण्यात आले.

तक्रारीनुसार, मोहाडी रोड परिसरातील एका ठिकाणी आरोपीने पीडितेला दारू पाजून तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिचे आक्षेपार्ह फोटो काढून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून तिचा छळ केल्याचा आरोप आहे.

याशिवाय, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपीने धमकावून पीडितेला घरातून नेले व सुमारे दोन महिन्यांहून अधिक काळ स्वतःच्या घरी ठेवले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, पीडितेने आरोपीकडे पुन्हा जाण्यास नकार दिल्यानंतर त्याचा मित्र गौरव पुरोहित याने सोशल मीडियावरून अश्लील संदेश पाठवून विनयभंग केल्याचा आरोप आहे. तसेच जय चौधरी याने पीडितेच्या घराजवळ अमली पदार्थ पोहोचविल्याचेही तपासात समोर आले आहे.

अखेर सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने आपल्या वडिलांसह ३ जून रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest