राहुरीतील फायरिंग प्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद; गावठी कट्ट्यासह २ लाखांहून अधिकांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

राहुरी (प्रतिनिधी): राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे घडलेल्या फायरिंग प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या काही तासांत मुळा धरण परिसरातून अटक केली. आरोपीकडून गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण २ लाख ४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २९ मे २०२६ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मोमीन आखाडा (ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी दगडू गंगाराम कोहकडे यांच्यावर जुन्या वादाच्या कारणावरून प्रवीण बाबासाहेब कोहकडे (वय २२) याने गावठी कट्ट्यातून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता.

या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६२४/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९ तसेच आर्म ॲक्ट कलम ७/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. आरोपीचा शोध सुरू असताना पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी बारागाव नांदूर ते मुळा धरण परिसरात फिरत आहे.

माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. मुळा धरण परिसरात काळे जॅकेट परिधान करून विना नंबरच्या मोटारसायकलवर फिरणाऱ्या संशयितास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव प्रवीण बाबासाहेब कोहकडे असल्याचे कबूल केले.

आरोपीच्या झडतीदरम्यान पोलिसांनी ३० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, ४ हजार रुपये किमतीची चार जिवंत काडतुसे, मोबाईल फोन, कट्टा ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे लेदर पाऊच, काडतुसांच्या रिकाम्या पुंगळ्या तसेच गुन्ह्यात वापरलेली विना नंबरची मोटारसायकल जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २,०४,६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी राहुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्माका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोउपनिरीक्षक संदीप मुरकुटे तसेच पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, भगवान थोरात, बाळासाहेब गुंजाळ, विशाल तनपुरे आणि प्रशांत राठोड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

स्व. सुभद्राबाई सुरेश नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘स्मृती प्रवेश अभियान...

मेहरुण (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे स्वर्गीय सौ. सुभद्राबाई सुरेश नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, दि. १ जून २०२६...

ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : ७० लाखांचे एमडी...

ठाणे(प्रतिनिधी) : ठाणे गुन्हे शाखा घटक-१ ने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत सुमारे ७० लाख रुपये किमतीचे ५००.०५ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) क्रिस्टल पावडर आणि...

गेवराई पोलिसांची धडक कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर...

गेवराई (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत गेवराई पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रॉली...

संपादक - रजत शेख

Latest