गेवराई पोलिसांची धडक कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

Spread the love

गेवराई (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत गेवराई पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली आहे. या कारवाईत सुमारे ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशानुसार तसेच गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दि. २९ मे २०२६ रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हिंगणगाव परिसरात पोलिसांनी गस्तीदरम्यान संशयित वाहनाची तपासणी केली. यावेळी एक ब्रास अवैध वाळूची वाहतूक करणारा महिंद्रा अर्जुन ५५५ DI ट्रॅक्टर व ट्रॉली आढळून आला. आवश्यक परवाना व कागदपत्रे सादर करता न आल्याने पोलिसांनी वाहनासह वाळू जप्त केली.

या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ३३०/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता तसेच खाण व खनिज अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोनि किशोर पवार, सपोनि जंजाळ, पोह. हंबर्डे, पोह. कल्याण राठोड, पोकॉ. खांडेकर, पोकॉ. गोरक्ष डोके, पोकॉ. पोटे तसेच होमगार्ड सुतार यांनी सहभाग घेतला.

अवैध वाळू माफियांविरोधातील अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

मेहरुणमध्ये एस.आय.आर. अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आतापर्यंत १० शिबिरांचे...

मेहरुण (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरुण परिसरात सुरू असलेल्या एस.आय.आर. (S.I.R.) अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २९ जूनपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत आतापर्यंत १०...

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा,...

जळगाव(प्रतिनिधी ):जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १२ लाख ६ हजार ९०८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा,...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विशाखा...

मेहरुण (प्रतिनिधी) : महिलांना कार्यस्थळी सुरक्षित, सन्मानपूर्ण व भेदभावमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे शैक्षणिक...

संपादक - रजत शेख

Latest