हर्णेतील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी ८ आरोपी अटकेत; पोलिसांची तात्काळ कारवाई

Spread the love

दापोली(प्रतिनिधी) : हर्णे येथील गोवा किल्ला परिसरात २७ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात दापोली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली आहे. या घटनेत दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चिन्मय सुधीर गुरव (वय २३, रा. हर्णे गुरववाडी) व त्यांचा मित्र महेंद्र रघुवीर हे गोवा किल्ला परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी “काल घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हॉट्सॲप ग्रुपवर का टाकला?” या कारणावरून त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ व मारहाण सुरू केली. त्यानंतर लोखंडी शिगेचा वापर करून दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. तसेच आरोपींसोबत असलेल्या १० ते १५ जणांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

या हल्ल्यात चिन्मय गुरव आणि महेंद्र रघुवीर यांच्या डोक्यासह तोंड, हात, पाय आणि पाठीवर गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून काही साक्षीदारांची प्रकृतीही चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०९/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपासादरम्यान जेन अस्लम हुनैरकर, मुफीज जावेद सोलकर, सलाह हसन कोडविलकर, नबिल निसार काझी, जैब ताजुद्दिन जमादार, हर्षद अझीम हुनेरकर, नाईफ आरिफ श्रीवर्धनकर तसेच एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपी क्रमांक १ ते ५ यांना २८ मे रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील चौकशीत आणखी दोन आरोपींचा सहभाग उघड झाल्याने त्यांनाही २९ मे रोजी अटक करण्यात आली.

या गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचा तपास दापोली पोलीस ठाण्याकडून सुरू असून पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढविली आहे.

ही कारवाई रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस, पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

मेहरुणमध्ये एस.आय.आर. अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आतापर्यंत १० शिबिरांचे...

मेहरुण (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरुण परिसरात सुरू असलेल्या एस.आय.आर. (S.I.R.) अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २९ जूनपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत आतापर्यंत १०...

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा,...

जळगाव(प्रतिनिधी ):जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १२ लाख ६ हजार ९०८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा,...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विशाखा...

मेहरुण (प्रतिनिधी) : महिलांना कार्यस्थळी सुरक्षित, सन्मानपूर्ण व भेदभावमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे शैक्षणिक...

संपादक - रजत शेख

Latest