संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत आरोग्य जनजागृती; वैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांना दिले स्वच्छतेचे महत्त्व

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, जंतसंसर्गापासून त्यांचे संरक्षण व्हावे आणि त्यांच्यामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने मेहरूण येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

 

या उपक्रमाला वैद्यकीय अधिकारी गीता देसले, आरती घुगे, सिस्टर योगिता भामरे, संगीता पाटील, साधना बाविस्कर, कविता सोनवणे तसेच आशा वर्कर उपस्थित होत्या. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर हात स्वच्छ धुणे, स्वच्छ पाणी पिणे तसेच परिसर स्वच्छ ठेवणे यांसारख्या आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले.

 

शालेय वयात योग्य आरोग्यविषयक सवयी लावल्यास जंतसंसर्गाचा धोका कमी करण्यास मदत होते. तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास आणि त्यांच्या सर्वांगीण विकासास हातभार लागतो, असे यावेळी सांगण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकाचे आभार मानले. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगाव जिल्हा पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई; ३२.४७...

जळगाव (प्रतिनिधी: हिरालाल राजपूत): जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. २६ ऑक्टोबर रोजी कासोदा...

जळगावात बनावट विदेशी मद्याच्या विक्रीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक...

जळगाव (प्रतिनिधी : मुकेश कोळी):    जळगाव शहरातील गिरणा पंपिंग परिसरात बनावट विदेशी मद्याची विक्री आणि खरेदी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी...

भंगारातील टायरला नवी झेप; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘टायर हॅकथॉन’...

जळगाव (प्रतिनिधी: आसमा शेख): शहरातील रामेश्वर कॉलनी येथील मेहरून रोजी आज टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने मेहरूण येथील श्री संत...

संपादक - रजत शेख

Latest