जळगावात बनावट विदेशी मद्याच्या विक्रीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी : मुकेश कोळी): 

 

जळगाव शहरातील गिरणा पंपिंग परिसरात बनावट विदेशी मद्याची विक्री आणि खरेदी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने २४ ऑक्टोबर रोजी छापा टाकला. या कारवाईत मद्याची विक्री करताना एक जण, तर खरेदी करताना दुसरा जण आढळून आला. दोघांनाही पथकाने ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

या कारवाईदरम्यान रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या पाच बॉक्ससह एक मोटारसायकल आणि तीन मोबाईल फोन असा एकूण १ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बनावट विदेशी मद्याच्या व्यवहारासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.

 

अटक करण्यात आलेल्या दोघांना जळगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सुरुवातीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपासादरम्यान आवश्यक सहकार्य न झाल्याचे विभागाकडून सांगण्यात आले असून, त्यानंतर दोघांची रवानगी १२ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत जिल्हा मध्यवर्ती कारागृह, जळगाव येथे करण्यात आली आहे.

 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जळगाव भरारी पथकाचे निरीक्षक अ. प्र. तारू, दुय्यम निरीक्षक वाय. वाय. सूर्यवंशी आणि डी. एस. पाटील तसेच कर्मचारी आर. पी. सोनवणे, जी. डी. अहिरे, डी. एस. पावरा, जी. डी. सूर्यवंशी आणि नरेंद्र पाटील यांच्या पथकाने केली. अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक डी. एस. पाटील करीत आहेत.

 

बनावट विदेशी मद्याची विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणातील मद्याच्या उगमासह संबंधित व्यवहारांची तपासणी केली जात आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

भंगारातील टायरला नवी झेप; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘टायर हॅकथॉन’...

जळगाव (प्रतिनिधी: आसमा शेख): शहरातील रामेश्वर कॉलनी येथील मेहरून रोजी आज टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने मेहरूण येथील श्री संत...

दक्षता जनजागृती सप्ताहाला जळगावात प्रारंभ; वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या...

जळगाव (प्रतिनिधी: राजू शेख)   ‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ या संकल्पनेतून भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती; ४४ आरोपींना अटक   जळगाव : भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि पारदर्शक कारभाराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार २६...

गोदावरी कॉलेजजवळ कोयता आणि तलवारीने प्राणघातक हल्ला; तीन आरोपी...

जळगाव (प्रतिनिधी:इमरान खान): शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ उधारीवर पान-सिगारेट न दिल्याच्या कारणावरून एका व्यावसायिकावर कोयता आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (दि. २३)...

संपादक - रजत शेख

Latest