जळगावातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

Spread the love

  • जळगाव (प्रतिनिधी): शहरातील हरी विठ्ठल नगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने अमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, कमलाबाई कैलास पावरा (वय ४०) या मूळ मध्य प्रदेशातील असून सध्या जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर परिसरात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्या आपल्या पतीसह सोप संदीप अपार्टमेंट येथे वॉचमन म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा पुनित कैलास पावरा (वय १७ वर्षे ११ महिने २२ दिवस) हा गुरुवार, २१ मे २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक बेपत्ता झाला.
  • कुटुंबीयांनी पुनितचा परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर मुलगा सापडत नसल्याने आई कमलाबाई पावरा यांनी रविवारी, २४ मे रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
  • तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १३७(२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक संजय शेलार हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Spread the love

या बातम्या देखील वाचा

मेहरुणमध्ये एस.आय.आर. अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आतापर्यंत १० शिबिरांचे...

मेहरुण (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरुण परिसरात सुरू असलेल्या एस.आय.आर. (S.I.R.) अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २९ जूनपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत आतापर्यंत १०...

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा,...

जळगाव(प्रतिनिधी ):जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १२ लाख ६ हजार ९०८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा,...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विशाखा...

मेहरुण (प्रतिनिधी) : महिलांना कार्यस्थळी सुरक्षित, सन्मानपूर्ण व भेदभावमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे शैक्षणिक...

संपादक - रजत शेख

Latest