मातीचे बीजफटाके बनवून संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश!

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी: आसमा शेख):

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज दिवाळी म्हटली की फटाक्यांचा उत्साह, रोषणाई आणि आनंदाचे वातावरण डोळ्यांसमोर येते. मात्र, या आनंदाला पर्यावरणसंवर्धनाची जोड देत मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबविला आहे. विद्यार्थ्यांनी मातीमध्ये विविध झाडांच्या बिया टाकून पर्यावरणपूरक ‘मातीचे बीजफटाके’ तयार केले असून, या उपक्रमातून त्यांनी हिरवळीच्या दिवाळीचा संदेश दिला आहे.

 

विद्यार्थ्यांनी मातीचा वापर करून त्यामध्ये विविध झाडांच्या बिया समाविष्ट केल्या आणि आकर्षक स्वरूपातील बीजफटाके तयार केले. दिवाळीनंतर या बीजफटाक्यांचा योग्य ठिकाणी वापर करून, आवश्यक पाणी व निगा राखल्यास त्यातून नवीन रोपांची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे परिसरात हिरवाई वाढण्यास मदत होईल, तसेच विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेम आणि पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होईल.

 

दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनिप्रदूषण टाळून निसर्गाशी मैत्री करणारी दिवाळी साजरी करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सणांचा आनंद घेतानाच पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, ही जाणीव विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून करून दिली.

 

‘फटाके मातीचे, आनंद हिरवाईचा’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या या कल्पक उपक्रमामुळे निसर्गसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

गोदावरी कॉलेजजवळ कोयता आणि तलवारीने प्राणघातक हल्ला; तीन आरोपी...

जळगाव (प्रतिनिधी:इमरान खान): शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ उधारीवर पान-सिगारेट न दिल्याच्या कारणावरून एका व्यावसायिकावर कोयता आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (दि. २३)...

फत्तेपुर पोलिसांची गुटखा तस्करांविरुद्ध कारवाई; १ लाख ६ हजारांचा...

फत्तेपुर (प्रतिनिधी: सतीश राठोड): प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्याविरुद्ध फत्तेपुर पोलिसांनी कारवाई करत एकाला अटक केली. या कारवाईत विमल पानमसाला,...

पहूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीस गेलेली बैलजोडी हस्तगत, २.८५...

पहूर(प्रतिनिधी: मुकेश): पिंपळगाव गोलाईत शिवारातून चोरीस गेलेली बैलजोडी हस्तगत करण्यात पहूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता,...

संपादक - रजत शेख

Latest