जळगाव बसस्थानकात वृद्ध महिलेचे मंगळसूत्र लंपास; गर्दीचा फायदा घेत चोरट्याची हातचलाखी

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी):नवीन बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीत एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडी येथील रमण कौतीक पाटील (वय ७०) हे आपल्या पत्नी यमुनाबाई पाटील यांच्यासह २२ मे रोजी जळगाव शहरात आले होते. दुपारी सुमारे २.१० वाजण्याच्या सुमारास ते नवीन बसस्थानक परिसरात असताना मोठ्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने यमुनाबाई यांच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि मंगळसूत्राचे पदक चोरून नेले.

चोरीला गेलेल्या दागिन्यांचे वजन सुमारे ९ ग्रॅम असून त्याची किंमत अंदाजे ३० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. हा प्रकार लक्षात येताच वृद्ध दाम्पत्याने तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

रमण पाटील यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ३०३(२) नुसार अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शरीफ शेख करत आहेत.

  1. दरम्यान, बसस्थानक परिसरात वाढत्या गर्दीमुळे अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Spread the love

या बातम्या देखील वाचा

बोदवड हद्दीत पोलिसांचे व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन ६० रेकॉर्डवरील आरोपींची...

बोदवड(प्रतिनिधी):दि. ४ सप्टेंबर : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बोदवड पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी शुक्रवारी व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन...

चोरीची मोटारसायकल विक्रीचा डाव उधळला; दोघे जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात,...

जळगाव(प्रतिनिधी: सरिता महाजन): चोरीची बजाज पल्सर मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विनाक्रमांकाची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, ती...

क्षेत्रभेटीतून धार्मिक व सांस्कृतिक वारशाची ओळख बेलेश्वर महादेव मंदिर...

मेहरूण(प्रतिनिधी: सरिता महाजन): विद्यार्थ्यांना भारतीय धार्मिक व सांस्कृतिक वारशाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, संस्कृती व परंपरांविषयी आदर निर्माण व्हावा, तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञानाची सांगड घालता...

संपादक - रजत शेख

Latest