नागद (प्रतिनिधी: हिरालाल राजपूत): दि. १५ : नागद येथील माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य रणजीत भास्कर पाटील यांच्या घरासमोर उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात दुचाकींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रणजीत पाटील हे रात्री १२ ते १२.१५ वाजेच्या सुमारास घरी परतले होते. त्यांनी नेहमीप्रमाणे आपली मोटारसायकल घरासमोर उभी केली होती. त्यानंतर रात्री सुमारे दोन वाजता केळी व्यापारी आबा श्याम पाटील आणि आरिफ हुसेन शेख हे बाहेरगावाहून केळी विक्री करून नागद येथे परतले. यावेळी आबा पाटील हे आरिफ शेख यांना सोडण्यासाठी गेले असता त्यांना रणजीत पाटील यांची मोटारसायकल घरासमोर उभी असल्याचे दिसले होते.
मात्र, त्यानंतर काही वेळातच ही मोटारसायकल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या दुचाकीचा क्रमांक एमएच-२०-९९१० असून, ती हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल आहे.
नेहमी घरासमोर उभी केली जाणारी मोटारसायकल याच ठिकाणाहून चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेचा तपास करून चोरीस गेलेली दुचाकी शोधून काढावी आणि संबंधित चोरट्याचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जा
त आहे.

