एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई : दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश ; दोन आरोपी अटकेत, चार मोटारसायकली जप्त

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी): एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून विविध कंपन्यांच्या तब्बल १ लाख ८७ हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

याबाबत माहिती अशी की, दि. १७ मे २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तक्रारदार संतोष रणछोड सैंदाणे (वय ४७, रा. वाघनगर, जळगाव) यांची होंडा शाईन (एमएच १९ सीएल ७५५८) ही मोटारसायकल सिंधी कॉलनी रोडवरील समर्थ हॉस्पिटलसमोरून अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

महेंद्र गोपाळ चव्हाण (वय २३, रा. खोटेनगर)

मुकेश ताराचंद चव्हाण (वय २६, रा. पिंप्राळा हुडको)

पोलिसी चौकशीत दोन्ही आरोपींनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.

आरोपी महेंद्र चव्हाण याच्याकडून पोलिसांनी पुढील वाहने जप्त केली :

होंडा शाईन – ₹५० हजार

टीव्हीएस वेगो – ₹५२ हजार

हिरो डिलक्स – ₹५० हजार

बजाज पल्सर – ₹३५ हजार

याप्रमाणे एकूण १ लाख ८७ हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गुणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पीएसआय राहुल तायडे, चंद्रकांत धनके यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

एमआयडीसी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील दुचाकी चोरट्यांमध्ये मोठी खळबळ उडाल


Spread the love

या बातम्या देखील वाचा

बोदवड हद्दीत पोलिसांचे व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन ६० रेकॉर्डवरील आरोपींची...

बोदवड(प्रतिनिधी):दि. ४ सप्टेंबर : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बोदवड पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी शुक्रवारी व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन...

चोरीची मोटारसायकल विक्रीचा डाव उधळला; दोघे जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात,...

जळगाव(प्रतिनिधी: सरिता महाजन): चोरीची बजाज पल्सर मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विनाक्रमांकाची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, ती...

क्षेत्रभेटीतून धार्मिक व सांस्कृतिक वारशाची ओळख बेलेश्वर महादेव मंदिर...

मेहरूण(प्रतिनिधी: सरिता महाजन): विद्यार्थ्यांना भारतीय धार्मिक व सांस्कृतिक वारशाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, संस्कृती व परंपरांविषयी आदर निर्माण व्हावा, तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञानाची सांगड घालता...

संपादक - रजत शेख

Latest