प्रशस्त’ अन् ‘उल्हास’ ॲपची शिक्षकांना माहिती; दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर भर

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन) मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयास केंद्रस्तरीय विशेष शिक्षक समाधान माळी यांनी सदिच्छा भेट देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसंदर्भात शिक्षकांना मार्गदर्शन केले.

यावेळी समाधान माळी यांनी ‘प्रशस्त’ व ‘उल्हास’ ॲपबाबत शिक्षकांना सविस्तर माहिती दिली. दिव्यांग विद्यार्थ्यांची शैक्षणिक नोंद, आवश्यक शैक्षणिक सुविधा, शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात प्रभावीपणे सहभागी करून घेण्यासाठी शिक्षकांनी संवेदनशीलता, सातत्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गरजा समजून घेऊन त्यानुसार अध्यापन पद्धती व शैक्षणिक साधनांचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

शाळेच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. ‘प्रशस्त’ व ‘उल्हास’ ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सुविधांचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक आधार देण्यावर भर देण्यात आला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. विशेष शिक्षक समाधान माळी यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

ईको वाहनांच्या सायलेंसरमधील मौल्यवान धातू चोरीच्या तयारीत असलेल्या दोघांना...

पारोळा (प्रतिनिधी इमरान खान) :दि. ७ सप्टेंबर : ईको वाहनांच्या सायलेंसरमधील कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधील मौल्यवान धातू चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दोन इसमांना पारोळा पोलिसांनी अटक...

पारोळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून २.५७...

पारोळा (प्रतिनिधी: इमरान खान): पारोळा पोलीस ठाणे हद्दीतील खेडीढोक येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीला जेरबंद करण्यात पारोळा पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून...

आनंद बॅटरी कंपनीतील चोरीचा गुन्हा उघडकीस; सहा आरोपी जेरबंद...

जळगाव (प्रतिनिधी: इमरान खान) : शहरातील एमआयडीसी परिसरातील ई-सेक्टरमध्ये असलेल्या श्री आनंद बॅटरी कंपनीतील चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या...

संपादक - रजत शेख

Latest