ईको वाहनांच्या सायलेंसरमधील मौल्यवान धातू चोरीच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक पारोळा पोलिसांची कारवाई; ६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

पारोळा (प्रतिनिधी इमरान खान) :दि. ७ सप्टेंबर : ईको वाहनांच्या सायलेंसरमधील कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधील मौल्यवान धातू चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दोन इसमांना पारोळा पोलिसांनी अटक केली. ही कारवाई दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील म्हसवे गावाजवळ करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी एकूण ६ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पारोळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, काही इसम ईको वाहनांच्या सायलेंसरमधील कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधील प्लॅटिनम, पॅलेडियम व रोडियम हे मौल्यवान धातू चोरी करण्याच्या तयारीत आहेत. माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

 

त्यानुसार पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी विशेष पथक तयार करून संबंधित ठिकाणी रवाना केले. पथक नाकाबंदी करीत असताना सायंकाळी सुमारे ५ वाजता म्हसवे गावाजवळ निळ्या रंगाची मारुती वॅगनार कार (क्रमांक DL-3-CBU-3358) संशयास्पदरीत्या आढळून आली. वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये दोन इसम आढळून आले.

 

चौकशीत त्यांनी आपली नावे यासिफ यामीन चौधरी (वय २२, रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) व आरीफ सलीम (वय २३, रा. अलीगढ, उत्तर प्रदेश) अशी सांगितली. वाहनाची झडती घेतली असता ईको वाहनांचे सायलेंसर काढण्यासाठी वापरण्यात येणारे टॉमी, हातोडा, रिंच व इतर साहित्य, तसेच ईको वाहनांचे तीन सायलेंसर आढळून आले. याशिवाय एका मोठ्या थैलीमध्ये दहा पांढऱ्या रंगाच्या कॅरीबॅग मिळून आल्या. त्यामध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधील मौल्यवान धातू असल्याचे आढळून आले.

 

पोलिसांनी दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, पारोळा तालुक्यातील रस्त्यांवर व सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या ईको वाहनांचे सायलेंसर काढून त्यातील मौल्यवान धातू चोरी करण्याचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

 

जप्त मुद्देमाल

 

अ.क्र.| मुद्देमाल| किंमत

१| मारुती वॅगनार कार| ₹४,००,०००

२| मौल्यवान धातू असलेल्या १० कॅरीबॅग| ₹१,५०,०००

३| ईको वाहनांचे ३ सायलेंसर| ₹७५,०००

४| Infinix मोबाईल| ₹१०,०००

५| लोखंडी टॉमी, हातोडा व रिंच सेट| किंमत नमूद नाही

एकूण| | ₹६,३५,०००

 

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आकाश पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे करीत आहेत.

 

कारवाईतील पोलीस अधिकारी व कर्मचारी

 

सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर विभाग विनायक बाजीराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

 

या पथकात सहायक पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे, पोलीस उपनिरीक्षक विजय बोंबे, पोलीस हेड कॉन्स्टेबल डॉ. शरद पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत पाटील, मिथुन पाटील, आकाश पाटील व तुषार सोनवणे यांचा समावेश होता.

 

तसेच महामार्ग पोलीस केंद्र पाळधी, जि. जळगाव येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल हितेश पाटील, राजेंद्र ठाकूर, अनिल सपकाळ, विजय दुमान, सुशील पाटील व चालक पोलीस नाईक संदीप पाटील यांनीही कारवाईत सहभाग घेतला. या पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

पारोळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून २.५७...

पारोळा (प्रतिनिधी: इमरान खान): पारोळा पोलीस ठाणे हद्दीतील खेडीढोक येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीला जेरबंद करण्यात पारोळा पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून...

आनंद बॅटरी कंपनीतील चोरीचा गुन्हा उघडकीस; सहा आरोपी जेरबंद...

जळगाव (प्रतिनिधी: इमरान खान) : शहरातील एमआयडीसी परिसरातील ई-सेक्टरमध्ये असलेल्या श्री आनंद बॅटरी कंपनीतील चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या...

एम.आय.डी.सी. हद्दीतील इलेक्ट्रिक दुकानातील घरफोडीचा गुन्हा उघड; तीन आरोपी...

जळगाव (प्रतिनिधी:इमरान खान): एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हद्दीतील ढोर बाजार परिसरातील इलेक्ट्रिक दुकानात झालेल्या घरफोडी चोरीचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना...

संपादक - रजत शेख

Latest