पारोळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून २.५७ लाखांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत

Spread the love

पारोळा (प्रतिनिधी: इमरान खान): पारोळा पोलीस ठाणे हद्दीतील खेडीढोक येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीला जेरबंद करण्यात पारोळा पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ५७ हजार रुपये किंमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान खेडीढोक, ता. पारोळा येथील फिर्यादी यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने संमतीशिवाय सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३३४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी पारोळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. दीपक पाटील यांना सखोल तपास करून आरोपीचा शोध घेण्याबाबत तसेच चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या.

त्यानुसार पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी आपल्या अधिपत्याखाली विशेष पथक तयार करून आरोपीचा तात्काळ शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले. तसेच तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे गोकुळ उर्फ दादू धर्मसिंग पाटील (वय २२, व्यवसाय शेती, रा. खेडीढोक, ता. पारोळा, जि. जळगाव) यास ताब्यात घेण्यात आले.

आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने सदर चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जप्त मुद्देमालाचा तपशील

पोलिसांच्या पथकाची कामगिरी

सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, जळगाव परिमंडळ तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक कोते, अमळनेर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. दीपक पाटील, पारोळा पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात सपोनि योगेश महाजन, पोहेकॉ/१३८८ कैलास साळुंके, पोकॉ/१३०० गिरीश सोनवणे, पोकॉ/८५० आशिष गायकवाड, पोकॉ/१२५७ सुनील पाटील, पोकॉ/१८९२ सतीश पाटील, पोकॉ/४४५ चत्तरसिंग मेहर तसेच पोकॉ/२२५८ अनिल राठोड यांचा समावेश होता.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

ईको वाहनांच्या सायलेंसरमधील मौल्यवान धातू चोरीच्या तयारीत असलेल्या दोघांना...

पारोळा (प्रतिनिधी इमरान खान) :दि. ७ सप्टेंबर : ईको वाहनांच्या सायलेंसरमधील कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधील मौल्यवान धातू चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दोन इसमांना पारोळा पोलिसांनी अटक...

आनंद बॅटरी कंपनीतील चोरीचा गुन्हा उघडकीस; सहा आरोपी जेरबंद...

जळगाव (प्रतिनिधी: इमरान खान) : शहरातील एमआयडीसी परिसरातील ई-सेक्टरमध्ये असलेल्या श्री आनंद बॅटरी कंपनीतील चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या...

एम.आय.डी.सी. हद्दीतील इलेक्ट्रिक दुकानातील घरफोडीचा गुन्हा उघड; तीन आरोपी...

जळगाव (प्रतिनिधी:इमरान खान): एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हद्दीतील ढोर बाजार परिसरातील इलेक्ट्रिक दुकानात झालेल्या घरफोडी चोरीचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना...

संपादक - रजत शेख

Latest