आनंद बॅटरी कंपनीतील चोरीचा गुन्हा उघडकीस; सहा आरोपी जेरबंद ३९० किलो शिशाच्या धातूच्या विटांसह १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी: इमरान खान) : शहरातील एमआयडीसी परिसरातील ई-सेक्टरमध्ये असलेल्या श्री आनंद बॅटरी कंपनीतील चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी सहा आरोपींना जेरबंद करण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या ९७ हजार ५०० रुपये किमतीच्या १६ नग शिशाच्या धातूच्या विटा, एकूण वजन ३९० किलो, तसेच गुन्ह्यात वापरलेली ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९ वाजेपासून १ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या सिमेंट कंपाऊंडला असलेली जाळी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर १ लाख २५ हजार रुपये किमतीच्या शिशाच्या धातूच्या २० नग विटा, एकूण वजन ५०० किलो, चोरी करून नेल्या होत्या. याबाबत कंपनीचे मालक लखन वासुदेव बुधानी, रा. कंवर नगर, जळगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७०३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५(३), ३३४(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुंडलीक धनके यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले.

सदर पथकाने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले. तसेच तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. या तपासातून आसिफ शहा सिकंदर शहा, मोहसीन शाह सिकंदर शाह, महेश उर्फ बापु संतोष भोई, मुकेश राजु परमार, शेख आबिद शेख मोहम्मद आणि शकील शहा रुबाब शहा, सर्व रा. जळगाव, यांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यातील चोरीबाबत कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

जप्त मुद्देमाल :

हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल — किंमत ३०,००० रुपये; गुन्ह्यात वापरलेली.

एकूण हस्तगत मुद्देमाल : १,२७,५०० रुपये.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुंडलीक धनके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरीश दिलीप पाटील, प्रमोद लाडवंजारी, रामकृष्ण पाटील, किरण चौधरी, मोतीलाल बोरसे, तसेच पोलीस अंमलदार शशिकांत मराठे आणि रमाकांत साळुंखे यांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

ईको वाहनांच्या सायलेंसरमधील मौल्यवान धातू चोरीच्या तयारीत असलेल्या दोघांना...

पारोळा (प्रतिनिधी इमरान खान) :दि. ७ सप्टेंबर : ईको वाहनांच्या सायलेंसरमधील कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधील मौल्यवान धातू चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दोन इसमांना पारोळा पोलिसांनी अटक...

पारोळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून २.५७...

पारोळा (प्रतिनिधी: इमरान खान): पारोळा पोलीस ठाणे हद्दीतील खेडीढोक येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीला जेरबंद करण्यात पारोळा पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून...

एम.आय.डी.सी. हद्दीतील इलेक्ट्रिक दुकानातील घरफोडीचा गुन्हा उघड; तीन आरोपी...

जळगाव (प्रतिनिधी:इमरान खान): एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हद्दीतील ढोर बाजार परिसरातील इलेक्ट्रिक दुकानात झालेल्या घरफोडी चोरीचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना...

संपादक - रजत शेख

Latest