जळगाव (प्रतिनिधी: इमरान खान) :रजा नगर, पिंप्राळा परिसरात धारदार कोयता हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत माजविणाऱ्या इसमावर रामानंद नगर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई ४ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आली.

पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुधाकर अंभोरे व सुशिल चौधरी यांना कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने रजा नगर, पिंप्राळा परिसरात जाऊन माहितीची खात्री केली. यावेळी एक इसम हातात कोयता घेऊन फिरताना आढळून आला.
पोलिसांनी शिताफीने कारवाई करून त्याच्याकडील धारदार कोयता जप्त केला. संशयितास कोयत्यासह रामानंद नगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
पोलीस शिपाई सागर नन्नवरे यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा रजिस्टर क्रमांक २४३/२०२६, आर्म्स अॅक्ट कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस हवालदार सुधाकर अंभोरे, सुशिल चौधरी, अजय पगारे, अतुल चौधरी व पोलीस शिपाई सागर नन्नवरे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुधाकर अंभोरे करीत आहेत.








