सुनसगावात इलेक्ट्रिक मोटारीच्या केबल चोरीचा गुन्हा उघडकीस; आठ आरोपी ताब्यात, ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

भुसावळ:(प्रतिनिधी) : सुनसगाव येथील ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीसह शेतकऱ्यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारींच्या केबल चोरी प्रकरणाचा भुसावळ तालुका पोलिसांनी उलगडा केला असून, या प्रकरणात आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून १० किलो वजनाची तांब्याची तार तसेच चार मोटारसायकली असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही घटना २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजता उघडकीस आली. सुनसगाव ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा कामासाठी वाघुर नदीपात्रातील ग्रामपंचायतीच्या विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी पंकज नथ्थू पाटील गेले होते. त्यावेळी त्यांना काही इसम मोटारीची केबल वायर चोरी करताना दिसून आले.

 

पंकज पाटील यांनी तत्काळ गावातील नागरिकांना मदतीसाठी बोलाविले. त्यानंतर गावातील ईश्वर अंकुश पाटील व मनोज कुंभार यांच्या शेतातील विहिरीवरील मोटारींच्याही केबल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. गावकऱ्यांनी संशयितांना पकडून ठेवले असून, त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

 

या प्रकरणात रोहित संजय बोदडे, आकाश एकनाथ सोनवणे, अजय विश्वास खरोटे, रोशन रमेश सपकाळे, मनोज धर्मराज पवार, प्रेम गणेश सोनवणे (सर्व रा. सुनसगाव), तसेच अजीज आझाद खाटीक व हर्षल शरीफ खाटीक (दोघे रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) या आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी आरोपींकडून सुमारे १० हजार रुपये किमतीची १० किलो वजनाची तांब्याची तार तसेच सुमारे ८० हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

ईश्वर पाटील यांच्या तक्रारीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा क्रमांक ०१६७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०३(२) व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि भुसावळ उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

कारवाईत प्रशांत दरेकर, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन; ग्रेड पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे; सहायक फौजदार संजय तायडे; पोलीस हवालदार धीरज मंडलिक; पोलीस कर्मचारी उदय नखोले, सचिन पारधी, मनोज पाटील, सुभाष सोनवणे तसेच वाहनचालक पोलीस हवालदार इश्तेहाक सैय्यद यांनी सहभाग घेतला.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘वीर गाथा 6.0’; छत्रपती शिवाजी...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): शहरातील रामेश्वर कॉलनी मेहरूण येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय भारताच्या गौरवशाली इतिहासातील प्रेरणादायी वीरांच्या शौर्य व पराक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात आनंददायी शनिवारचा अनोखा उपक्रम चिमुकल्यांच्या...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरूण शहरातील आज रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला आणि हस्तकौशल्याला वाव देण्यासाठी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व...

बैलापासून ट्रॅक्टरपर्यंत; बदलत्या शेतीसोबत पोळ्याचेही बदलते रूप संत ज्ञानेश्वर...

जळगाव (प्रतिनिधी) : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पोळा सणाचे औचित्य साधून आधुनिक शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने ट्रॅक्टर...

संपादक - रजत शेख

Latest