गेवराई पोलिसांची धडाकेबाज कारवाई : मोटरसायकल चोर 24 तासांत जेरबंद

Spread the love

  • गेवराई (प्रतिनिधी)’
  • नवनीत काँवत यांच्या आदेशानुसार सर्व प्रकारच्या चोरीच्या घटनांवर प्रभावी आळा घालण्यासाठी गेवराई पोलिसांनी वेगाने कारवाई करत मोटरसायकल चोरी प्रकरणातील आरोपीला अवघ्या 24 तासांत अटक केली.
  • दिनांक 13 मे 2026 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गेवराई शहरातील जुना बसस्टँड परिसरातील हॉटेल साई प्रसाद समोरून एक मोटरसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी वाहन मालकाने 14 मे रोजी पोलीस स्टेशन गेवराई येथे तक्रार दाखल केली होती.
  • तक्रार दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपीचा शोध घेत अवघ्या 24 तासांत मोटरसायकल चोराला चोरीच्या वाहनासह ताब्यात घेण्यात आले.
  • आरोपी परसराम आबासाहेब बाराखडे (रा. गोविंदवाडी) याच्याकडून चोरीस गेलेली हिरो पॅशन मोटरसायकल (क्रमांक एमएच 21 एएम 2089) जप्त करण्यात आली आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
  • ही कारवाई सचिन पांडकर यांच्या आदेशाने तसेच अनिल घटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत कौशोर पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी दिलीप सरवदे, अमोल सोनवणे, ऋषीकेश पोटे, आरफ बागवान आणि विनोद कुटे यांनी सहभाग घेतला.

Spread the love

या बातम्या देखील वाचा

बोदवड हद्दीत पोलिसांचे व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन ६० रेकॉर्डवरील आरोपींची...

बोदवड(प्रतिनिधी):दि. ४ सप्टेंबर : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बोदवड पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी शुक्रवारी व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन...

चोरीची मोटारसायकल विक्रीचा डाव उधळला; दोघे जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात,...

जळगाव(प्रतिनिधी: सरिता महाजन): चोरीची बजाज पल्सर मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विनाक्रमांकाची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, ती...

क्षेत्रभेटीतून धार्मिक व सांस्कृतिक वारशाची ओळख बेलेश्वर महादेव मंदिर...

मेहरूण(प्रतिनिधी: सरिता महाजन): विद्यार्थ्यांना भारतीय धार्मिक व सांस्कृतिक वारशाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, संस्कृती व परंपरांविषयी आदर निर्माण व्हावा, तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञानाची सांगड घालता...

संपादक - रजत शेख

Latest