जळगावात ACB ची मोठी कारवाई : १.५० लाखांच्या लाचेसह उपनिबंधकाचा खासगी पंटर जाळ्यात

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी):

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग च्या पथकाने जळगावात मोठी कारवाई करत अवैध सावकारी प्रकरणातील चौकशी अहवाल अनुकूल पाठविण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी उपनिबंधकासह एका खासगी इसमाला जाळ्यात अडकविले. या कारवाईमुळे सहकार विभागात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदारांविरुद्ध अवैध सावकारी व्यवसायासंदर्भात चौकशी सुरू होती. या चौकशीचा अहवाल अनुकूल पाठवून तक्रारदार व त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी उपनिबंधक सह संस्था, जळगाव येथील जगदीश बारी यांनी सुरुवातीला तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. नंतर तडजोडीअंती ही रक्कम ३ लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली.

तक्रारदारांनी याबाबत १८ मे २०२६ रोजी जळगाव ACB कडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ACB ने पंचांसमक्ष पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. पडताळणीदरम्यान उपनिबंधक जगदीश बारी यांनी “मागील प्रकरणात तुम्ही वकील लावल्यामुळे आमचे नुकसान झाले, त्यामुळे नकारात्मक अहवाल दिला होता; आता अनुकूल अहवाल पाठवितो,” असे सांगत लाचेची मागणी कायम ठेवली होती.

दरम्यान, ठरल्याप्रमाणे लाचेच्या रकमेतील पहिला हप्ता म्हणून १ लाख ५० हजार रुपये खाजगी इसम देविदास पाटील (मानद कार्यकारी अधिकारी, जळगाव जिल्हा बँक असोसिएशन) यांच्याकडे २० मे रोजी देण्याचे ठरले होते.

यानुसार ACB ने बी. जे. मार्केट परिसरातील जळगाव जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशनच्या कार्यालयात सापळा रचला. यावेळी देविदास पाटील हे तक्रारदारांकडून १ लाख ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई जळगाव ACB चे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोहेकॉं. बालू मराठे, मपोहेकॉं. संगीता पवार, पोलीस कॉन्स्टेबल मनोज पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन चाटे यांच्या पथकाने केली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

बोदवड हद्दीत पोलिसांचे व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन ६० रेकॉर्डवरील आरोपींची...

बोदवड(प्रतिनिधी):दि. ४ सप्टेंबर : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बोदवड पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी शुक्रवारी व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन...

चोरीची मोटारसायकल विक्रीचा डाव उधळला; दोघे जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात,...

जळगाव(प्रतिनिधी: सरिता महाजन): चोरीची बजाज पल्सर मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विनाक्रमांकाची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, ती...

क्षेत्रभेटीतून धार्मिक व सांस्कृतिक वारशाची ओळख बेलेश्वर महादेव मंदिर...

मेहरूण(प्रतिनिधी: सरिता महाजन): विद्यार्थ्यांना भारतीय धार्मिक व सांस्कृतिक वारशाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, संस्कृती व परंपरांविषयी आदर निर्माण व्हावा, तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञानाची सांगड घालता...

संपादक - रजत शेख

Latest