Home जळगांव विद्यार्थ्यांच्या किल्ला प्रदर्शनाने पालकांची मने जिंकली

विद्यार्थ्यांच्या किल्ला प्रदर्शनाने पालकांची मने जिंकली

0
विद्यार्थ्यांच्या किल्ला प्रदर्शनाने पालकांची मने जिंकली
Oplus_131072

जळगाव (प्रतिनिधी): शहरातील रामेश्वर कॉलनी येथील आज रोजी

संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी पालक-शिक्षक संघाची सभा क्रमांक ४ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेला पालकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृतींचे प्रात्यक्षिक प्रदर्शन यावेळी आयोजित करण्यात आले होते. राजगडसह इतर किल्ल्यांच्या सुंदर आणि सर्जनशील मॉडेल्सनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि मेहनतीला पालकांनी मनापासून दाद दिली.

इयत्ता सहावीतील विद्यार्थी राज दांडगे, अमित तडवी, कन्हैया संदीप पाटील, समर्थ जाधव, यश घोडेराव, शिवम गोसावी, नैतिक पाटील, मानव निंबाळकर, निशांत मोहरकर, हिमांशू मोहरकर, महेश जाधव, कार्तिक गोंधळी, हार्दिक पाटील, वेदांत खराटे व नैतिक मिस्त्री यांनी उत्कृष्ट किल्ला प्रतिकृती साकारून विशेष ठसा उमटवला.

सभेदरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच शाळेमधील विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली. पालक व शिक्षक यांच्यातील संवादातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्याची भावना अधिक दृढ झाली.

सदर कार्यक्रम मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक व पर्यवेक्षिका सौ. शितल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.