जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘आत्मविश्वास विकास अभियान’ उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ
जळगाव : संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आत्मविश्वास विकास अभियान’ या विशेष उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांमधील भीती, संकोच व न्यूनगंड दूर करून त्यांच्यात सकारात्मक विचारसरणी व आत्मविश्वास निर्माण करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “यश संपादन करण्यासाठी आत्मविश्वास ही सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष गुण असतात. त्या गुणांना योग्य दिशा व प्रोत्साहन मिळाल्यास विद्यार्थी नक्कीच प्रगती करू शकतात.”
या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी दररोज प्रेरणादायी विचार, आठवड्याला वक्तृत्व व वाचन सराव, विविध लघु स्पर्धा, कौतुक योजना तसेच वैयक्तिक मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ‘आठवड्याचा आत्मविश्वासी विद्यार्थी’ या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शाळेतील शिक्षकवृंदही सक्रिय सहभाग घेत आहे. या अभियानामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांच्या व्यक्तिमत्व विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास शाळा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आत्मविश्वास विकास अभियान’ या विशेष उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांमधील भीती, संकोच व न्यूनगंड दूर करून त्यांच्यात सकारात्मक विचारसरणी व आत्मविश्वास निर्माण करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “यश संपादन करण्यासाठी आत्मविश्वास ही सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष गुण असतात. त्या गुणांना योग्य दिशा व प्रोत्साहन मिळाल्यास विद्यार्थी नक्कीच प्रगती करू शकतात.”
या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी दररोज प्रेरणादायी विचार, आठवड्याला वक्तृत्व व वाचन सराव, विविध लघु स्पर्धा, कौतुक योजना तसेच वैयक्तिक मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ‘आठवड्याचा आत्मविश्वासी विद्यार्थी’ या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शाळेतील शिक्षकवृंदही सक्रिय सहभाग घेत आहे. या अभियानामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांच्या व्यक्तिमत्व विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास शाळा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.