मुलगा झाला नाही म्हणून निर्दयी पित्याने ३ दिवसांच्या चिमुरडीची हत्या

जामनेर ( प्रतिनिधी)

मुलाच्या हव्यासापोटी माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील मोराड येथे उघडकीस आली आहे. 

 

चौथ्यांदाही मुलगीच झाल्याच्या रागातून एका निर्दयी पित्याने अवघ्या तीन दिवसांच्या आपल्या चिमुरड्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली असून, यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

 

कृष्णा लालचंद राठोड (वय २६, रा. मोराड, ता. जामनेर) असे आरोपी पित्याचे नाव आहे. आरोपीला यापूर्वी तीन मुली असून, चौथ्यांदा मुलगा होईल, अशी त्याची अपेक्षा होती. मात्र १३ नोव्हेंबर रोजी त्याच्या पत्नीने पुन्हा एका मुलीला जन्म दिला. या घटनेमुळे तो तीव्र मानसिक तणावात होता.

 

२५ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास रागाच्या भरात कृष्णा राठोड याने घरात असलेल्या लाकडी पाटाने तीन दिवसांच्या राधिका या बालिकेच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या गंभीर हल्ल्यात चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS