जळगाव | (आपले शब्द न्यूज)
पतंगोत्सवाचे दिवस सुरू झाल्याने रस्त्यावर मांजामुळे अपघात व जखमी होण्याच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेषतः दुचाकी चालविताना अधिक सावधगिरी बाळगावी, असे कळकळीचे
आवाहन आपले शब्द न्यूज चे (मुख्य संपादक: रजत शेख) यांनी केले आहे.
आजपासून किमान १८ तारखेपर्यंत दुचाकी वाहन अतिशय हळू वेगाने चालवावे, तसेच लहान मुलांना दुचाकीच्या पुढील बाजूस बसवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारी धारदार मांज गळ्याभोवती अडकून गंभीर दुखापत होण्याचा धोका असतो.
त्यामुळे दुचाकीस्वारांनी गळ्याभोवती उबदार, मऊ व जाडसर मफलर बांधणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.
सध्या दररोज वर्तमानपत्रांमध्ये मांजेमुळे जखमी झालेल्यांच्या बातम्या प्रसिद्ध होत असून, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.
नागरिकांनी स्वतः काळजी घेण्यासोबतच हा संदेश नातेवाईक, मित्रपरिवार व शेजाऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
थोडीशी काळजी मोठा अनर्थ टाळू शकते, त्यामुळे सर्वांनी सतर्क राहावे, ही नम्र विनंती 🙏









