जळगाव( जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान)
शहरातील रामेश्वर कॉलनी येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या शैक्षणिक कार्यास चालना देण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत शाळेला दोन टीव्ही संच सप्रेम भेट दिले.
माजी विद्यार्थी उत्कर्षा सपके, उर्वशी सपके, लीना माळी, पायल सोनगिरे, तेजश्री माळी, ऋतिका कासार, पल्लवी महाजन, भावेश पालवे, लकी सपके, श्याम चव्हाण, सुमित दुसाने, कार्तिक इंगळे, लोकेश वाघ, भाग्यश्री मिस्त्री व ऋतुजा वाणी यांच्या संयुक्त सहभागातून ही उपयुक्त भेट देण्यात आली.
या टीव्ही संचांमुळे शाळेमधील अध्यापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमांच्या सहाय्याने आधुनिक पद्धतीने शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मा. मुकेश नाईक यांनी माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. अशा उपयुक्त भेटींमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागतो, तसेच माजी विद्यार्थ्यांचे शाळेशी असलेले नाते अधिक दृढ होते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमावेळी उपस्थित शिक्षकवर्गानेही शाळेच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली.








