संत ज्ञानेश्वर विद्यालयात मुलींसाठी स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण

जळगाव: ( प्रतिनिधी)

शहरातील रामेश्वर कॉलनी येथील आज रोजी संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनींच्या स्वसंरक्षण व आत्मविश्वास वृद्धीसाठी मुलींसाठी कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

या कार्यक्रमाच्या प्रसंगी ब्लॅक बेल्ट कराटे प्रशिक्षिका प्रज्ञा बोदडे यांचे विद्यालयाच्या वतीने सस्नेह स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात मुलींसाठी स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत, कराटे प्रशिक्षणामुळे शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, एकाग्रता व आत्मविश्वास वाढतो, असे मत व्यक्त केले.

 

यावेळी ब्लॅक बेल्ट प्रशिक्षिका प्रज्ञा बोदडे यांनी विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षणाची प्राथमिक माहिती देत विविध स्वसंरक्षण तंत्रांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. संभाव्य धोक्याच्या प्रसंगी स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत त्यांनी विद्यार्थिनींना उपयुक्त सूचना दिल्या.

 

या उपक्रमाला शिक्षकवृंद व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यालयात राबविण्यात येणारा हा उपक्रम मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार असून, विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत करणार आहे.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS