संत ज्ञानेश्वर विद्यालयात प्रहरी गटातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम

जळगाव(संपादक : रजत शेख) 

शहरातील रामेश्वर कॉलनी येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात प्रहरी गटाच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम उत्साहात राबविण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक हे उपस्थित होते.

 

कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून रूपाली आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे गंभीर शारीरिक व मानसिक दुष्परिणाम स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहावे, असे आवाहन केले. योग्य संगत, सकारात्मक विचार व सुदृढ जीवनशैली यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

 

प्रहरी गटातील विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये व प्रतिज्ञांच्या माध्यमातून अंमली पदार्थ विरोधी प्रभावी संदेश दिला. या उपक्रमाला उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

 

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक यांनी अंमली पदार्थांचे व्यसन हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घातक असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध, सजग व जबाबदार जीवन जगावे, असा संदेश त्यांनी दिला.

 

या कार्यक्रमास शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांविषयी जागरूकता, सामाजिक जबाबदारी व आत्मसंयमाची भावना निर्माण झाली.

.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS