Home जळगांव जळगाव गटना: करंट लागून बाप–मुलीचा मृत्यू; भाची गंभीर

जळगाव गटना: करंट लागून बाप–मुलीचा मृत्यू; भाची गंभीर

0
जळगाव गटना: करंट लागून बाप–मुलीचा मृत्यू; भाची गंभीर
Oplus_131072

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील मेहरून येथील अक्सानगर परिसरात आज सकाळी हाई-टेंशन वीजवाहिनीच्या करंटचा भीषण गटना घडला. या दुर्घटनेत मौलाना साबिर खान नवाज खान (वय 36) आणि त्यांची मुलगी आलिया (वय 18) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून भाची मारिया फातिमा (वय 12) गंभीर जखमी झाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मारिया फातिमा कपडे वाळत घालण्यासाठी घराच्या छतावर गेली असता तिचा हात घराजवळून जाणाऱ्या हाई-टेंशन लाइनला लागला आणि तिला करंट बसला. भाचीला वाचवण्यासाठी धावलेल्या आलियालाही करंटने विळखा घातला. दोघींना संकटात पाहून त्यांना मदत करण्यासाठी मौलाना साबिर खान पुढे सरसावले, परंतु तेही हाई-टेंशन लाइनच्या संपर्कात आले.

 

या तिघांनाही तीव्र करंट बसला. घटनास्थळीच बाप–मुलीचा मृत्यू झाला असून मारिया फातिमा हिला गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय व मेडिकल कॉलेजमध्ये धाव घेतली. नातेवाईकांनी महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप केला असून संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.