Home जळगांव जळगाव महानगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. १८ मध्ये ‘ऑटो रिक्षा’ वेगात! जळगाव शहरात

जळगाव महानगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. १८ मध्ये ‘ऑटो रिक्षा’ वेगात! जळगाव शहरात

0
जळगाव महानगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. १८ मध्ये ‘ऑटो रिक्षा’ वेगात! जळगाव शहरात
Oplus_131072

जळगाव: (रजत शेख) 

 महानगरपालिका निवडणूक रणधुमाळीला वेग आला असून प्रभाग क्र. १८ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागातून सौ. सुनिता चंद्रकांत भापसे या उमेदवार ‘ऑटो रिक्षा’ या निवडणूक निशाणीवर मैदानात उतरल्या असून नागरिकांमध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

 

विशेष म्हणजे आजपर्यंत प्रभागातील सर्व विकासकामे, नागरिकांचे प्रश्न, अडचणी आणि पाठपुरावा हे ‘चंदू भाऊ’ यांनी खंबीरपणे सांभाळले आहेत, अशी चर्चा सध्या परिसरात जोरात सुरू आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा याबाबत चंदू भाऊ यांनी सातत्याने लक्ष दिल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

“काम बोलते – ऑटो रिक्षा चालते!” असा नारा आता प्रभाग क्र. १८ मध्ये घरोघरी ऐकू येत आहे.

 

 विकासकामांचा ट्रॅक रेकॉर्ड, जनतेशी थेट संवाद आणि जमिनीवर उतरून काम करण्याची पद्धत यामुळे सौ. सुनिता भापसे यांची उमेदवारी अधिक मजबूत होत असल्याचे राजकीय जाणकार सांगतात