संत ज्ञानेश्वर विद्यालयात तानाजी पुण्यतिथीनिमित्त ‘तानाजी’ चित्रपटाचे प्रदर्शन

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील रामेश्वर कॉलनी येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात वीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी ‘तानाजी’ हा प्रेरणादायी ऐतिहासिक चित्रपट दाखविण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला वीर तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी तानाजींच्या शौर्यगाथेचा संक्षिप्त आढावा घेत विद्यार्थ्यांना स्वराज्य, देशभक्ती व त्याग यांचे महत्त्व समजावून सांगितले.

चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतिहासाची ओळख होण्यासोबतच राष्ट्रप्रेम, धैर्य व कर्तव्यनिष्ठा यांचे प्रेरणादायी संदेश मिळाले.

मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अशा ऐतिहासिक चित्रपटांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना दृढ होते तसेच आपल्या गौरवशाली इतिहासाबद्दल अभिमान निर्माण होतो.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पर्यवेक्षक निलेश पवार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS