Home शैक्षणिक श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0
श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
  1. Huजळगाव (रजत शेख) शहरातील रामेश्वर  कॉलनी येथील आज रोजी

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली शिस्तबद्ध व जोशपूर्ण सामूहिक कवायत उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरली. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. तसेच शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी असाक्षर मुक्त गाव करण्यासाठी साक्षरता शपथ घेतली.

कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक, संचालक भागवत सानप, एकनाथ वंजारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल कोळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पर्यवेक्षक निलेश पवार यांनी विशेष सहकार्य केले.

या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीमय वातावरणात पार पडला.