जळगाव :(संपादक: रजत शेख)
पोलन पेठ, दाना बाजार परिसरातील श्री गुरुदत्त सेवा मंडळातर्फे दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी गुरुदत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाआरतीने झाली. ही आरती माननीय आमदार राजू मामा भोळे, गुरुदत्त सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तुकाराम चौधरी, तसेच सामाजिक कार्यकर्त्या चित्रा (चित्रलेखा) मालपाणी यांच्या हस्ते संपन्न झाली.
शहरात सुरू असलेल्या कडाक्याच्या थंडीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत ५00 गरजू मुलांना स्वेटरचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमात आमदार राजू मामा सुरेश भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
नेहमी जनतेच्या सेवेत तत्पर असलेल्या भाजपा जळगाव शहर चिटणीस चित्रलेखा ताई मालपाणी यांनी स्वतः मुलांना स्वेटर वाटप करत त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली. थंडीमुळे त्रस्त असलेल्या गरजू बालकांसाठी हा उपक्रम दिलासा ठरला.
यावेळी बोलताना आमदार राजू मामा भोळे म्हणाले,
“समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे हेच आमचे खरे राजकारण आहे. गरजूंची सेवा हीच खरी ईश्वरसेवा.”
चित्रलेखा ताई मालपाणी यांनीही समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याचा विश्वास व्यक्त केला.
या सामाजिक उपक्रमाचे परिसरातील नागरिक तसेच उपस्थित सर्वांकडून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमास संगीता समाधानी, कविता लढ्ढा, राजेश बन्सल, नामदेव चौधरी, जितेंद्र पानसर यांसह मोठ्या संख्येने नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गुरुदत्त जयंतीनिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजातील संवेदनशीलतेचे व सेवाभावाचे उत्तम उदाहरण ठरला आहे.









