Home जळगांव शिवशक्तीनगर परिसरात प्रौढ महिलेला लक्ष्य करून मंगळसूत्र लांबवले — दुचाकीवरील दोघा भामट्यांचा पोलिसांकडून शोध सुरू

शिवशक्तीनगर परिसरात प्रौढ महिलेला लक्ष्य करून मंगळसूत्र लांबवले — दुचाकीवरील दोघा भामट्यांचा पोलिसांकडून शोध सुरू

0
शिवशक्तीनगर परिसरात प्रौढ महिलेला लक्ष्य करून मंगळसूत्र लांबवले — दुचाकीवरील दोघा भामट्यांचा पोलिसांकडून शोध सुरू
Oplus_131072

 

 

जळगाव (संपादक :रजत शेख) शहरातील शिवशक्तीनगर रोड परिसरात सोमवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी पायी फिरणाऱ्या प्रौढ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शिवशक्तीनगर परिसरात राहणाऱ्या उषाबाई देविदास बोरसे या महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कृषी विद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्या नेहमीप्रमाणे दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री आपल्या नात कनिष्कासह फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडल्या होत्या.

 

रात्री सव्वानऊच्या सुमारास त्या सुनील रत्नपारखे यांच्या घरासमोरून परतत असताना काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्या जवळ येताच झडप घातली. दुचाकीवरील मागील सीटवर बसलेल्या, अंदाजे २५ ते ३० वयोगटातील, काळी टोपी घातलेल्या इसमाने गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व त्यातील पदक हिसकावून दुचाकीवरून वेगाने पलायन केले.

 

अचानक घडलेल्या या घटनेने उषाबाई घाबरून गेल्या आणि त्यांनी आरडाओरड केली, मात्र चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

 

उषाबाई बोरसे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार धनराज पाटील पुढील तपास करीत आहेत