प्रवेशासोबत पर्यावरणाची भेट – संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा अभिनव उपक्रम

Spread the love

मेहरुण (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील दिनांक 6/5/26 रोजी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. शाळेच्या इको क्लबतर्फे “एक विद्यार्थी – एक वृक्ष” ही संकल्पना राबवली जात असून, नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना वृक्ष लागवडीसाठी बीज भेट दिली जात आहे.

या उपक्रमामागील उद्देश प्रत्येक कुटुंबाने किमान एक तरी वृक्ष लावावा आणि विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून निसर्गाविषयी प्रेम व जाणीव निर्माण व्हावी हा आहे. पर्यावरण रक्षणासाठी शाळेने उचललेले हे पाऊल समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक यांनी सांगितले की, वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे जतन करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या उपक्रमाचे पालक व नागरिकांकडून कौतुक होत असून, शाळेच्या या प्रयत्नातून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश समाजात पोहोचत आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest