रावेर गुन्हे शोध पथकाची आभोडा येथे धाड; गोमांस विक्री प्रकरणी एक अटक, एक फरार

Spread the love

रावेर (प्रतिनिधी):

 

रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने आभोडा गावात अवैध गोमांस विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत एकाला अटक केली असून एक संशयित फरार झाला आहे. या कारवाईत सुमारे ६०० किलो गोमांस, कत्तलीसाठी वापरली जाणारी हत्यारे तसेच तीन गोवंश जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत.

 

पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, आभोडा गावातील बसस्टँड परिसरात गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन व गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी सकाळी धाड टाकली. यावेळी उस्मान हसन कुरेशी (वय ४८, रा. आभोडा) हा आपल्या राहत्या घरात दोन जनावरांची कत्तल करून गोमांस विक्रीसाठी मांस कापत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

 

कारवाईदरम्यान आरोपीकडून अंदाजे ३०० किलो गोमांस, कुऱ्हाड व सुरे जप्त करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रंजीत पाटील यांच्या उपस्थितीत गोमांसाचे नमुने घेऊन उर्वरित मालाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली.

 

याचवेळी आभोडा गावातील चावडी भागातही गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तेथे धाव घेतली. मात्र पोलिसांना पाहून इरफान रहेमान उर्फ लंगड्या कुरेशी (वय ३२, रा. आभोडा) हा संशयित गल्लीबोळाचा फायदा घेत फरार झाला. त्याच्या घरातून अंदाजे ३०० किलो गोमांस, कुऱ्हाड व सुरे जप्त करण्यात आले.

 

तपासादरम्यान आठवडे बाजार परिसरात कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आलेली तीन गोवंश जनावरेही पोलिसांना आढळून आली. सुमारे २७ हजार रुपये किमतीची ही जनावरे पुढील संगोपनासाठी गोशाळेत पाठविण्यात आली आहेत.

 

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून महाराष्ट्र प्राणी संरक्षण व सुधारणा अधिनियम तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून फरार संशयिताचा शोध सुरू आहे. या गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे.

 

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन आणि गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest