नऊ महिन्यांपासून फरार आरोपी जळगावात अटकेत

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी): रामेश्वर कॉलनीतील विशाल उर्फ विक्की रमेश मोची (वय २६) खून प्रकरणातील नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. आमीन हैदर तडवी (वय २२, रा. हरिविठ्ठलनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, रामानंदनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

विशाल मोची हा १७ ऑगस्ट २०२५ रोजी मित्रांसह दीक्षितवाडी येथील महावितरण कार्यालयात वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार देण्यासाठी जात होता. त्यावेळी वाढदिवस साजरा करीत असलेल्या काही संशयितांनी जुन्या वादातून त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून केला होता. या घटनेनंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात यापूर्वीच पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र आमीन तडवी हा घटनेनंतर फरार झाला होता. गेल्या नऊ महिन्यांपासून तो पुणे येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

दरम्यान, आमीन तडवी हा कुटुंबीयांना भेटण्यासाठी जळगावात आल्याची गोपनीय माहिती रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोहेकॉ. सुशील चौधरी यांना मिळाली. त्यांनी सुधाकर अंभोरे व सागर देवरे यांच्या मदतीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील चौकशीसाठी त्याला जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

जळगावात येताच पोलिसांनी आरोपीला हेरून अटक केल्याने खून प्रकरणाच्या तपासाला आणखी गती मिळाली आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

बोदवड हद्दीत पोलिसांचे व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन ६० रेकॉर्डवरील आरोपींची...

बोदवड(प्रतिनिधी):दि. ४ सप्टेंबर : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बोदवड पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी शुक्रवारी व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन...

चोरीची मोटारसायकल विक्रीचा डाव उधळला; दोघे जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात,...

जळगाव(प्रतिनिधी: सरिता महाजन): चोरीची बजाज पल्सर मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विनाक्रमांकाची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, ती...

क्षेत्रभेटीतून धार्मिक व सांस्कृतिक वारशाची ओळख बेलेश्वर महादेव मंदिर...

मेहरूण(प्रतिनिधी: सरिता महाजन): विद्यार्थ्यांना भारतीय धार्मिक व सांस्कृतिक वारशाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, संस्कृती व परंपरांविषयी आदर निर्माण व्हावा, तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञानाची सांगड घालता...

संपादक - रजत शेख

Latest