लातूर पोलिसांचे ‘ऑलआऊट’ व ‘कोंबिंग ऑपरेशन’; ४ जणांवर शस्त्र कायद्यान्वये कारवाई, ५ जणांवर प्रतिबंधात्मक गुन्हे

Spread the love

लातूर(प्रतिनिधी ): जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी लातूर पोलीस दलाच्या वतीने दि. १६ ते १७ मे २०२६ दरम्यान मध्यरात्री अचानक ‘ऑलआऊट’ व ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले. या विशेष मोहिमेमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. या कारवाईत जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलीस अधिकारी आणि १४५ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.

ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या घरांवर अचानक भेटी देऊन त्यांच्या हालचालींची पडताळणी केली. संबंधित आरोपी सध्या काय करतात, कुठे राहतात, त्यांच्या वर्तनात काही संशयास्पद बदल आहेत का याची सखोल माहिती घेण्यात आली. विशेषतः मालमत्तेविषयक गुन्ह्यांमध्ये सहभागी होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले.

या मोहिमेदरम्यान ४ जणांविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या ताब्यातील अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे दिसून आले.

तसेच मालमत्तेविषयक गुन्हे करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या ५ जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ (क) अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ऑपरेशनअंतर्गत घरफोडी व इतर गंभीर गुन्ह्यांतील ३५ सराईत आरोपींच्या घरी जाऊन त्यांच्या हालचालींची माहिती घेण्यात आली. भविष्यात कोणतेही समाजविघातक कृत्य करू नये, अशी समजही त्यांना पोलिसांकडून देण्यात आली.

याशिवाय लॉजेस व हॉटेल्सची तपासणी करण्यात आली असून जिल्ह्यातील ३० संवेदनशील ठिकाणांची पाहणी करण्यात आली. विविध ३३ ठिकाणी नाकाबंदी करून ४२३ संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ७ वाहनचालकांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लातूर पोलिसांनी राबविलेल्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांना स्पष्ट इशारा मिळाला असून कायदा व सुव्यवस्थेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या ‘ऑलआऊट’ व ‘कोंबिंग ऑपरेशन’ सातत्याने राबवून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवले जाणार असल्याचे लातूर पोलिसांकडून सांगण्यात आले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

बोदवड हद्दीत पोलिसांचे व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन ६० रेकॉर्डवरील आरोपींची...

बोदवड(प्रतिनिधी):दि. ४ सप्टेंबर : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बोदवड पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी शुक्रवारी व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन...

चोरीची मोटारसायकल विक्रीचा डाव उधळला; दोघे जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात,...

जळगाव(प्रतिनिधी: सरिता महाजन): चोरीची बजाज पल्सर मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विनाक्रमांकाची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, ती...

क्षेत्रभेटीतून धार्मिक व सांस्कृतिक वारशाची ओळख बेलेश्वर महादेव मंदिर...

मेहरूण(प्रतिनिधी: सरिता महाजन): विद्यार्थ्यांना भारतीय धार्मिक व सांस्कृतिक वारशाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, संस्कृती व परंपरांविषयी आदर निर्माण व्हावा, तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञानाची सांगड घालता...

संपादक - रजत शेख

Latest