अपघात कमी करण्यासाठी विशेष मोहीम; वाहतूक शाखा व सेनगाव पोलिसांची संयुक्त कारवाई

Spread the love

सेनगाव (प्रतिनिधी): जिल्ह्यातील वाढते अपघात प्रमाण कमी करण्यासाठी तसेच नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी हिंगोली जिल्हा वाहतूक शाखा व सेनगाव पोलीस स्टेशन यांच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली.

मा. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन तथा अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली. सेनगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अपघात प्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणांवर वाहनांची तपासणी करण्यात आली.

रिसोड रोडवरील कोळसा, वटकळी तसेच जिंतूर रोडवरील भानखेडा, हत्ता नाईक टी-पॉईंट, लिंबाळा तांडा टी-पॉईंट या भागांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी ओव्हर स्पीडने वाहन चालविणारे, हेल्मेटचा वापर न करणारे तसेच अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर वाहनांवर कारवाई करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान विविध वाहनांवर एकूण ४८ केसेस करण्यात आल्या असून ६९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सदर कारवाई जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक शरद मरे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक अमलदार नापोशी संदीप जाधव, पोशी सुखदेव जाधव तसेच सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के, पोशि संतोष जाधव, पोशि गजानन कुंडकर आणि चालक परमेश्वर क्षीरसागर यांनी संयुक्तरीत्या केली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest