भुसावळात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह दोघे जेरबंद

Spread the love

भुसावळ(प्रतिनिधी): शहरात बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन संशयितांना बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आरोपींकडून गावठी पिस्तुल, मॅगझिन व एक जिवंत काडतूस असा सुमारे ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४ मे २०२६ रोजी मध्यरात्री १२:१० वाजेच्या सुमारास शिरपूर-कन्हाळा रोडवरील घोडे पीर बाबा दर्गाच्या मागील मोकळ्या जागेत काही इसम संशयास्पद हालचाली करत असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ पथक तयार करून घटनास्थळी धाड टाकली.

यावेळी दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान त्यांच्या जवळून लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल, त्याचे मॅगझिन आणि एक जिवंत राऊंड आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गावठी पिस्तुलाची किंमत अंदाजे ४० हजार रुपये तर जिवंत काडतुसाची किंमत सुमारे १ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असद अली शेख खालीद अली (वय १९, रा. आझाद नगर, बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) आणि मोहम्मद राजीक मोहम्मद आरिफ (रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ) अशी आहेत.

ही कारवाई बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल टी. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल जावेद हकीम शाह यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध आर्म अॅक्ट कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे करीत आहेत. शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

बोदवड हद्दीत पोलिसांचे व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन ६० रेकॉर्डवरील आरोपींची...

बोदवड(प्रतिनिधी):दि. ४ सप्टेंबर : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बोदवड पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी शुक्रवारी व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन...

चोरीची मोटारसायकल विक्रीचा डाव उधळला; दोघे जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात,...

जळगाव(प्रतिनिधी: सरिता महाजन): चोरीची बजाज पल्सर मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विनाक्रमांकाची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, ती...

क्षेत्रभेटीतून धार्मिक व सांस्कृतिक वारशाची ओळख बेलेश्वर महादेव मंदिर...

मेहरूण(प्रतिनिधी: सरिता महाजन): विद्यार्थ्यांना भारतीय धार्मिक व सांस्कृतिक वारशाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, संस्कृती व परंपरांविषयी आदर निर्माण व्हावा, तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञानाची सांगड घालता...

संपादक - रजत शेख

Latest