जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; हद्दपार सराईत आरोपी जेरबंद, गावठी पिस्तूल जप्त

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी ):स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल (मॅगझीनसह) जप्त केले आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना १ जुलै रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, हद्दपार सराईत गुन्हेगार विजय वसंत अहिरे उर्फ भोमपाली (वय ३२, रा. गेंडालाल मिल परिसर, जळगाव) हा लोकशेड परिसरात विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत आहे.

 

या माहितीची खातरजमा करून पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे व त्यांच्या पथकाने शिवाजीनगर परिसरातील गेंडालाल मिलजवळील लोकशेड येथे सापळा रचला. आरोपीला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून सिल्वर रंगाचे गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल व मॅगझीन असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९९/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ तसेच संबंधित प्रतिबंधात्मक कायद्यांन्वये कारवाई करण्यात आली आहे.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय अहिरे उर्फ भोमपाली याच्याविरुद्ध यापूर्वी जळगाव शहर व एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, मारहाण, दंगल, शस्त्र बाळगणे आदी गंभीर स्वरूपाचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत.

 

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

🌱 पर्यावरण सप्ताहानिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयात २०० बियांचे बीजारोपण

मेहरूण (प्रतिनिधी): पर्यावरण सप्ताह (१ ते ७ जुलै) निमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे ग्रीन डे उत्साहात साजरा करण्यात आला....

पोलीस निरीक्षक पवन देसले यांची तत्परता; हरवलेला ६ वर्षीय...

चोपडा (प्रतिनिधी): चोपडा शहरातील गणेश कॉलनी परिसरातून खेळता खेळता रस्ता चुकून हरवलेल्या ६ वर्षीय चिमुकल्याचा चोपडा शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत शोध लावत त्याला...

धरणगावातील घरफोडीचा गुन्हा उघड; दोन आरोपी अटक, एका विधिसंघर्षग्रस्त...

धरणगाव (प्रतिनिधी): धरणगाव शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले...

संपादक - रजत शेख

Latest