जळगाव(प्रतिनिधी) : शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज
श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे मत जाणून घेण्यासाठी ‘सूचना पेटी’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उपयुक्त सूचना, तक्रारी आणि विविध कल्पना संकलित केल्या जाणार आहेत.
विद्यार्थ्यांना कोणतीही भीती न बाळगता आपले विचार मांडता यावेत, तसेच पालकांनाही शाळेच्या कार्यपद्धतीबाबत आपले मत व्यक्त करण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. शाळेच्या विविध घटकांमध्ये पारदर्शकता आणि संवाद वाढवण्यावर यामध्ये विशेष भर देण्यात आला आहे.
सूचना पेटीत प्राप्त होणाऱ्या योग्य आणि उपयुक्त सूचनांचा गांभीर्याने विचार करून त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले.
या उपक्रमामुळे शाळा, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होऊन शैक्षणिक गुणवत्ता निश्चितच वाढीस लागेल, असा विश्वास मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी व्यक्त केला आहे