धुळे(प्रतिनिधी: राहील देशमुख) : नरडाणा पोलीस स्टेशनने तत्पर कारवाई करत BlaBlaCar अॅपच्या माध्यमातून प्रवाशाच्या नावाखाली कारमध्ये लिफ्ट घेऊन चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या दोन आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
दि. ११ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री १२.४३ वाजताच्या सुमारास राहुल सपकाळ (रा. नरडाणा, ता. शिंदखेडा) यांनी डायल ११२ वर कॉल करून मुंबई-आग्रा महामार्गावर एका कारमध्ये तीन जण एका व्यक्तीस मारहाण करत असल्याची माहिती दिली. यावर पोलीस कर्मचारी योगेश गिते व अजय सोनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिसांना पाहताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
घटनास्थळी सापडलेल्या तनुष राजेश तोमर (वय २६, मूळ भोपाल, सध्या नवी मुंबई) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी BlaBlaCar अॅपवरून प्रवासी घेतले होते. नाशिक येथून ‘राजू’ नावाच्या व्यक्तीसह आणखी दोघांना कारमध्ये बसवले होते.
प्रवासादरम्यान एका आरोपीने उलटी करण्याचा बहाणा करून कार थांबवली. त्यानंतर आरोपींनी चालकाच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून त्याचे हात-पाय बांधले व चाकू व पिस्टलचा धाक दाखवून कार व पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. चालकाने विरोध करताच त्याला मारहाण करून त्याच्या खिशातील ५,००० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवून नरडाणा रेस्टहाऊस मागील शेतात दोन संशयितांना पाठलाग करून पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गजानन शिवकुमार शर्मा (वय २८, रा. ठाणे) व अभिनव पप्पु शर्मा (वय १९, रा. उत्तरप्रदेश) अशी आहेत.
आरोपींकडून ५,००० रुपये रोख, एक नकली पिस्टल, एक चाकू, मिरची स्प्रे, दोरीचे तुकडे व मोबाईल असा एकूण सुमारे १५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी नरडाणा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली असून या कामगिरीचे सर्वत्र कौतुक हो
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
त आहे.