Home जळगांव देव हृदयात आहे — ह. भ. प. सरला ताई वाघ यांचे मार्गदर्शन मेहरुण,जळगाव

देव हृदयात आहे — ह. भ. प. सरला ताई वाघ यांचे मार्गदर्शन मेहरुण,जळगाव

0
देव हृदयात आहे — ह. भ. प. सरला ताई वाघ यांचे मार्गदर्शन मेहरुण,जळगाव

 

(संपादक: रजत शेख)

मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर चौकात सुरू असलेल्या संकिर्तन सप्ताहात ह. भ. प. सरला ताई वाघ यांनी भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले. “देव कुठे बाहेर नाही, तो प्रत्येकाच्या हृदयात वसलेला आहे. भक्ती म्हणजे देवाच्या शोधात बाहेर धावण्यापेक्षा स्वतःच्या अंतरात्म्यात डोकावणे,” असे सांगत त्यांनी उपस्थितांना आत्मचिंतनाचा मोलाचा संदेश दिला.

 

सरला ताईंच्या प्रभावी कीर्तन आणि भावपूर्ण प्रवचनाला श्रोत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांनी भक्तांना सद्वर्तन, निष्ठा आणि मन:शांती यांची जीवनातील महत्ता समजावून सांगितली. कार्यक्रमाच्या समारोपाला मोठ्या संख्येने भक्तांनी “भक्ती हृदयात, देव हृदयात” हा संदेश आत्मसात करत सरला ताईंच्या विचारांचे मनःपूर्वक कौतुक केले.

 

संकिर्तन सप्ताहाचे आयोजन मा. नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक (मेहरुण) यांच्या वतीने करण्यात आले आहे. दैनिक हरिनाम कीर्तनात गायक ह. भ. प. कैलास महाराज अंजदे, ह. भ. प. अविनाश महाराज जामनेरकर, मृदुंगाचार्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज राजुर, पेटीवादक ह. भ. प. विठ्ठल महाराज, ह. भ. प. विशाल महाराज जळगावकर, अंभई विणेकरी भास्कर महाजन, अशोक देवरे (मेहरूण), तसेच टाळकरी श्रीराम मंदिर भजनी मंडळ आणि श्री विठ्ठल मंदिर भजनी मंडळ (मेहरूण) यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे