बीजयुक्त गणपतीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश मानव सेवा प्राथमिक विद्या मंदिरात विद्यार्थ्यांना शाडूमातीच्या गणपती निर्मितीचे प्रात्यक्षिक

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): शहरातील खोटे नगर येथील रोजी आज गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने जळगाव महानगरपालिका व मानव सेवा मंडळ, जळगाव संचलित मानव सेवा प्राथमिक विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी बीजयुक्त शाडूमातीच्या गणपती निर्मितीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.

यावेळी चित्रकार व मूर्तिकार सुनिल दाभाडे यांनी विद्यार्थ्यांना शाडूमातीपासून गणपतीची मूर्ती कशी तयार करावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच बीजयुक्त गणपतीची संकल्पना, त्याचे पर्यावरणीय महत्त्व आणि विसर्जनानंतर त्यामधील बीजांपासून रोपांची निर्मिती कशी होऊ शकते, याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.

महानगरपालिका अभियंता प्रकाश पाटील यांनी पर्यावरणपूरक गणपती मूर्तींचे महत्त्व स्पष्ट करत गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आवाहन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका माया अंबटकर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची गरज व प्रत्येकाने पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील, तसेच मनोजकुमार बावस्कर, योगिता घोलाणे, हर्षा चौधरी, मीरा चौधरी आणि वैशाली साळुंके यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शाडूमातीपासून गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

या अभिनव उपक्रमाचे मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया, मानद सचिव विश्वनाथ जोशी, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी कौतुक केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणाऱ्या चित्रकार व मूर्तिकार सुनिल दाभाडे यांच्या उपक्रमाचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

 

‘गणपती बाप्पा मोरया, पर्यावरणपूरक गणपती घरोघरी आणूया!’ असा संदेश देत कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘वीर गाथा 6.0’; छत्रपती शिवाजी...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): शहरातील रामेश्वर कॉलनी मेहरूण येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय भारताच्या गौरवशाली इतिहासातील प्रेरणादायी वीरांच्या शौर्य व पराक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात आनंददायी शनिवारचा अनोखा उपक्रम चिमुकल्यांच्या...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरूण शहरातील आज रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला आणि हस्तकौशल्याला वाव देण्यासाठी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व...

बैलापासून ट्रॅक्टरपर्यंत; बदलत्या शेतीसोबत पोळ्याचेही बदलते रूप संत ज्ञानेश्वर...

जळगाव (प्रतिनिधी) : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पोळा सणाचे औचित्य साधून आधुनिक शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने ट्रॅक्टर...

संपादक - रजत शेख

Latest